अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘रॉकी हॅण्डसम’ने १.८४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद समिश्र असला, तरी गेल्या गुरुवारी झालेल्या प्रदर्शनामध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली. त्यानंतर सलग सुट्ट्या आल्यामुळे चित्रपटाला चांगली कमाई करता आली असण्याची शक्यता आहे.
निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत अभिनेत्री श्रुती हसनने काम केले आहे. जॉन आणि श्रुती या दोघांनी यापूर्वी ‘वेलकम बॅक’मध्ये एकत्र काम केले होते. विशेष म्हणजे निशिकांत कामत यांनी सुद्धा या चित्रपटात एक व्यक्तिरेखा साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे विविध ठिकाणी प्रमोशन करण्यात येत होते. प्रमोशनवेळी जॉन अब्राहम यानेही हा चित्रपट प्रेक्षकांना आणि विशेषतः महिलांना आवडेल, असे मत मांडले होते. अॅक्शनपट असलेल्या ‘रॉकी हॅण्डसम’ला आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Story img Loader