अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या आगामी ‘रॉकी हँडसम’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. मात्र, याअगोदरच्या दोन्ही पोर्स्टसप्रमाणेच या पोस्टरमध्येही जॉनने स्वत:चा पूर्ण लूक दाखवणे टाळले आहे. दरम्यान, नव्या पोस्टरवर पिळदार शरीरयष्टीचा जॉन अब्राहम पाठमोरा उभा असून त्याच्या दोन्ही हातात चाकू दिसत आहेत. जॉनच्या लूकमुळे या चित्रपटाबद्दलची जॉनच्या चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘रॉकी हँडसम’ हा अॅक्शनपट असून निशिकांत कामतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २५ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहम स्वत: या चित्रपटाचा सहनिर्माता आहे.

Story img Loader