करोनाच्या वाढत्या संक्रमणाला पाहता महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाउन लागु करण्यात आलं आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच घरी आहेत. त्यामुळे आता हे सेलिब्रिटी त्यांच्या पाळीव प्राण्यांना बाहेर फिरायला घेऊन जाताना दिसतात. बऱ्याच वेळा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यात आता अभिनेता रोहित रॉयने सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्या सेलिब्रिटींवर संताप व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन जाणाऱ्यांना त्याने प्रश्न विचारला आहे.

रोहितचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. रोहितने हे ट्वीट करत सेलिब्रिटींवर संताप व्यक्त करत प्रश्न विचारला आहे. “आपले सगळे आवडते सेलिब्रिटी त्यांच्या पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन जाताना दिसतं आहेत. त्यांचे अतिशय कूल आणि क्लासिक लुकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत….त्यांच्यापैकी कोणाच्या ही हातात मला कधी प्लास्टिकची पिशवी दिसत नाही. मला आश्चर्य वाटतं की त्यांच्या पाळीव प्राण्यांनी केलेली ही घाण कोण उचलतं?,” अशा आशयाचे ट्वीट रोहितने केले आहे.

दरम्यान, रोहितचे हे ट्वीट पाहताच त्याचा भाऊ आणि अभिनेता रोनित रॉयने उत्तर दिले. “ही या लोकांची जुनी सवय आहे. यांनी केलेली घाण दुसऱ्यांना स्वच्छ करावी लागते.”

रोहितने सेलिब्रिटींवर पहिल्यांदाच टीका केली असं नाही. काही दिवसांपूर्वी सेलिब्रिटी शहरात विविध ठिकाणी फिरताना दिसत होते. त्यावर त्याने ट्वीट करत त्यांना प्रश्न विचारला होता.

आणखी वाचा : …यावेळी चुकीच्या माणसाशी पंगा घेतला; केआरकेनं सलमानला दिलं आव्हान

दरम्यान, या वर्षी प्रदर्शित झालेल्या जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’ या चित्रपटात दिसला होता.  रोहित हा सोशल मीडियावर नेहमीच त्याच मत मांडताना दिसतो.