बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या जवळपास आठ दिवसांमध्ये १२० कोटी रुपयांची कमाई केली केली होती. आता दुसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने २५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सूर्यवंशी चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास १२० कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची जादू कायम असल्याचे पाहायला मिळते. चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास २५० कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे समोर आले आहे.

सूर्यवंशी हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचे हक्क जवळपास १०० कोटी रुपयांना विकले असल्याचे म्हटले जात आहे. बॉक्स ऑफिसवर जादू करणारा हा चित्रपट आता ओटीटी नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ४ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहे.

सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच अभिनेते गुलशन ग्रोव्हर खलनायकाच्या भूमिकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. मात्र करोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader