रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक दिवसही उलटत नाही तोच हा चित्रपट ‘तमिळरॉकर्स’या वेबसाइटवर लीक झाला. ‘तमिळरॉकर्स’ या पायरसी करणाऱ्या वेबसाईटची डोकदुखी ही दिग्दर्शक निर्मात्यांपुढे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वेबसाईटवर लगाम घालण्यात अपयश आल्यानं चित्रपटाच्या कमाईवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. गेल्याच आठवड्यात या साईट्वरून झिरो, केजीएफ चित्रपट लीक झाले होते. ‘तमिळरॉकर्स’ या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या वेबसाइटच्या २ हजारांहून अधिक मायक्रोसाइट् देखील आहेत. या साईट्वरून या वर्षभरात संजू, काला, संजू, कबाली, २.०, केजीएफ, पद्मावत यांसारखे अनेक चित्रपट लीक करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Simmba box office collection Day 1 : जाणून घ्या ‘सिम्बा’ची पहिल्या दिवसाची कमाई

बॉलिवूडपेक्षाही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी ‘तमिळरॉकर्स’ ही वेबसाइट मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. यापुर्वी २.० च्या दिग्दर्शकांनी या वेबसाईटवरून होणारी पायरसी रोखण्यासाठी मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर मद्रास हायकोर्टाने १२ हजार वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. मात्र इतकं असूनही हा चित्रपट लीक झाला होता. फक्त हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपट नाही तर हॉलिवूड चित्रपटही ‘तमिळरॉकर्स’वरून लीक व्हायला लागले आहेत.