अॅक्शन, रोमान्स, ड्रामाने परिपूर्ण अशा मसालेपटांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी ओळखला जातो. प्रेक्षकांना पैसा वसूल चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळावं यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करताना दिसतो. रोहित शेट्टीचा आगामी ‘सिम्बा’ हा चित्रपट येत्या २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘सिम्बा’ची टीम छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे पोहोचली. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘सिम्बा’ चित्रपटाची कल्पना कशी सुचली हे रोहितने सांगितलं.

‘एक दाक्षिणात्य चित्रपट पाहताना मला सिम्बाची कल्पना सुचली. तेव्हाच मी विचार केली की असा चित्रपट नक्की बनवायचा आणि यामुळेच मी सिम्बा प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय,’ असं रोहित म्हणाला. या चित्रपटात रणवीर एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे तर सोनू सूद खलनायकाच्या भूमिकेत आहे.

वाचा : गेल्या तीन वर्षांतील ख्रिसमसला शाहरुखची ‘झिरो’ ओपनिंग 

‘सिम्बा’चा ट्रेलर पाहता या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन आणि कॉमेडी दृश्यांवर भर देण्यात आला आहे. तर अतरंगी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा रणवीरही त्याच्या संवादाने आणि अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांचं पूरेपुर मनोरंजन करणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट चांगली कमाई करू शकेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.

Story img Loader