आतापर्यंत प्रेक्षकांनी रोहीत शेट्टी दिग्दर्शित अॅक्शन चित्रपट पाहिले आहेत. आता रोहीत शेट्टी वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. टेलिव्हिजनवरील ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाच्या पाचव्या पर्वाचे सुत्रसंचलन करणार आहे.
मुळात दिग्दर्शक असलेला रोहीत शेट्टी बॉलीवूडमध्ये अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा याआधीपासूनच होती. मात्र, रोहीतने चित्रपटाच्या माध्यमातून थेट अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश न करता. सुरूवात सुत्रसंचलनाने करावी असे ठरविलेले दिसते आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या पाचव्या पर्वाचे सुत्रसंचलन करण्याच्या शर्यतीत रोहीत शेट्टीसोबत अभिनेता अजय देवगण आणि सोनू सूद यांचीही नावे होती. पण, संबंधित वाहिनीच्या निर्मात्यांनी रोहीत शेट्टीच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. येत्या मार्चमध्ये सुरू होणार आहे. 

Story img Loader