‘कुठलाही नट भूमिका निवडत नाही, भूमिका नटाला निवडते. लहानपणी मला रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्णा’ मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारायला मिळाली हे माझे भाग्य आहे; परंतु मी ही भूमिका साकारली त्यामागे माझी मेहनत होती. परमेश्वर आपल्याला दिसेल इतके आपण पुण्यवान नाही. सर्वसामान्य माणसांना त्यांचा कृष्ण कसा होता? याची कल्पना करण्यासाठी मी फक्त एक माध्यम होतो. याची जाणीव मला माझ्या मध्यमवर्गीय संस्कारातून झाली होती,’ अशी भावना अभिनेता स्वप्निल जोशी याने पहिल्यावहिल्या ‘मराठी तितुका मेळवावा – विश्व मराठी संमेलन २०२३’च्या व्यासपीठावर बोलताना व्यक्त केली. सुप्रसिद्ध निवेदिका आणि अभिनेत्री दीप्ती भागवत यांनी स्वप्निलशी संवाद साधला.

‘प्रत्येक मराठी नाटक, मालिका, चित्रपट व कलाकृतीवर प्रेम करा. पॉपकॉर्न महाग वाटत असतील तर खाऊ नका, घरूनच जेवून जा; पण मराठी चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन बघा. मराठी मालिकांच्या मागे ठामपणे उभे राहा. मराठी नाटकाला आपण उत्तम प्रतिसाद देतोच. सर्वसामान्यपणे लोकांचा रक्तगट हा ए पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह असा असतो. मला वाटते की मराठी माणसाचा रक्तगट हा नाटक आहे. आपल्या रक्तात, संस्कृतीत, सभ्यतेत, जडणघडणीत नाटक आहे. त्यामुळे नाटक हे अजरामर असून चिरतरुण आहे व कायम राहील; पण मराठी चित्रपटही मोठा होत असून त्यात वेगवेगळे प्रयोग होत आहेत, तर त्यामागे ठामपणे उभे राहा,’ असे आवाहन स्वप्निलने प्रेक्षकांना केले.

Nitin Gadkari question is why caste is considered in elections
निवडणुकीतच जातीचा विचार का; नितीन गडकरी यांचा प्रश्न
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”

अनेक व्यक्तिरेखांशी अभिनेता म्हणून नाते जुळते, पण स्वभाव, गुणधर्म म्हणून जुळत नाही. त्या व्यक्तिरेखेची विचार करण्याची पद्धत पटत नाही; पण एक अभिनेता म्हणून ती व्यक्तिरेखा सार्थकी नेणे, पूर्णत्व देणे आणि दिग्दर्शकाच्या पसंतीप्रमाणे उभे करणे हे माझे काम आहे आणि मी ते इमानदारीने करीत आहे, असे स्वप्निलने आपल्या विविध भूमिकांविषयी बोलताना सांगितले. येत्या १३ जानेवारी रोजी तो परेश मोकाशी दिग्दर्शित व मधुगंधा कुलकर्णी लिखित ‘वाळवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतील सौरभ या भूमिकेला संपूर्णत: छेद देणारी अनिकेत ही वेगळी भूमिका ‘वाळवी’ चित्रपटात साकारली असल्याचे स्वप्निलने नमूद केले.


‘फक्त तुझे पाय समोर आहेत’
लहानपणी मी श्रीकृष्णाची भूमिका साकारत असताना माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले लोक माझ्या पाया पडायला यायचे, तेव्हा मला खूप अवघडल्यासारखे वाटायचे आणि मी कोणाला माझ्या पाया पडू द्यायचो नाही. तेव्हा रामानंद सागर मला म्हणाले की, ‘तुला कोणी सांगितले की, ते तुझ्या पाया पडत आहेत. ते भगवान श्रीकृष्णाच्याच पाया पडत आहेत, फक्त तुझे पाय त्यांच्यासमोर आहेत.’ ज्या वयात पालक आपल्या मुलांवर संस्कार करतात, त्या संस्कार होण्याच्या वयात तू संपूर्ण जगावर संस्कार करीत आहेस. हे भान ठेवून भूमिका साकार. माझ्या मते हे भान भगवान श्रीकृष्ण आणि रामानंद सागर यांनी माझ्याकडून ठेवून घेतले. जर माझे काम लोकांना आवडले असेल तर ती त्यांची कृपा आहे, असेही स्वप्निल म्हणाला.

मराठीत ओटीटी माध्यम..
मराठी भाषेसाठी काही तरी करायला हवे या अनुषंगाने मी माझ्या सहकाऱ्यांसह ‘वन ओटीटी’ या नावाने एक प्रादेशिक ओटीटी माध्यम या वर्षांपासून सुरू करतो आहे, त्यात मराठी चित्रपट, मालिका, नाटक, वेबशोज, माहितीपट या सर्व गोष्टी असणार आहेत. या माध्यमातून दर्जेदार मराठी कार्यक्रम, चित्रपट आदी केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही, तर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही स्वप्निलने सांगितले.