गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डची चर्चा सुरु आहे. या आधी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या शेरा या बॉडीगार्डची चर्चा सुरु होती. सेलिब्रिटींचे बॉडीगार्ड हे सतत लाइमलाईटमध्ये असतात. हे बॉडीगार्ड या कलाकारांच्या सावलीसारखे सोबत असतात आणि त्यांच्या संरक्षणाची पूर्ण काळजी घेतात. पण, तुम्हाला माहित आहे का या कलाकारांच्या सुरक्षेच काम ‘क्यूं की सास भी कभी बहु थी’ या मालिकेतील अभिनेता रोनित रॉय करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोनित रॉयने फक्त बॉलिवूड सेलिब्रिटी नाही तर अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनाही सुरक्षा दिली आहे. एवढंच नाही तर कलाकार आणि त्यांच्या क्रूचे रक्षण करण्यासाठी अनेक चित्रपटांच्या सेटवर त्याचे बॉडीगार्ड दिसले आहेत. रोनितने २ दशकांपूर्वी त्याची सुरक्षा एजन्सी सुरु केली. या एजन्सीच्या माध्यमातून तो हॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना देखील सुरक्षा देतो. मात्र, एजन्सी सुरु करण्याआधी रोनित हॉटेलमध्ये भांडी धुवायचा. हॉटेलमध्ये भांडी धुण्यापासून एजन्सीची सुरुवात करे पर्यंत त्याने अनेक अडचणींचा सामना केला.

पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यावर पुढचे चार वर्षे रोनित बेरोजगार होता. जेवायलाही पैसे नव्हते अशी अवस्था होती. रोनितला इतर कलाकारांसारखेच अभिनेता होण्याची इच्छा होती. मात्र, चित्रपटांमध्ये काम न मिळाल्यामुळे त्याने हॉटेलमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करण्यास सुरवात केली. तिथे त्याने भांडी धुण्यापासून ते बार टेंडिंग आणि टेबलावर जेवण सर्व करायच्या कामा पर्यंत सगळी काम केली. रोनित हे सगळं काम करायचा पण त्याच्या मनातील अभिनेता होण्याचे स्वप्न होते.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर राखी सावंत म्हणाली…

रोनितचे अभिनेता होण्याचे स्वप्न हे १९९९ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी त्याला ‘जाने तेरे नाम’ हा चित्रपट मिळाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर होता. हा चित्रपट सिल्वर जुबली चित्रपट ठरला होता. यानंतर रोनितने आणखी काही हिट चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्याला कोणती ऑफर मिळाली नाही. रोनित एक फ्लॉप अभिनेता असल्याचे म्हटले जातं होते. त्यामुळे त्याला ५ते ६ वर्ष कोणतही काम मिळालं नाही.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

त्यानंतर रोनित छोट्या पडद्याकडे वळला. त्याला लोकप्रियता मिळाली. मात्र, त्याला पाहिजे तेवढे पैसे मिळाले नाही. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की त्याला एका एपिसोडसाठी २ हजार रूपये मिळायचे. मग रोनितने स्वत: व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रोनितने विचार केला की कलाकारांना सुरक्षा देण्याचं काम सुरु केलं पाहिजे. तेव्हा रोनितने एक सिक्योरिटी एजन्सीची सुरुवात केली. या एजन्सीचं नाव Ace Security And Protection Agency आहे.

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

ही एजन्सी सलमान खान, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान आणि मिथुन चक्रवर्ती सारख्या अनेक कलाकारांना सुरक्षा देते. फक्त बॉलिवूडनाही तर हॉलिवूड सेलिब्रिटींना देखील रोनित सुरक्षा देण्याचे काम रोनितची एजन्सी करते. जेव्हा पण हॉलिवूड सेलिब्रिटी भारतात येतात तेव्हा त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही रोनितच्या एजन्सीची असते.

ही एजन्सी सुरु करण्याआधी रोनितने स्वत: अमिताभ बच्चन आणि आमिर खानच्या बॉडीगार्डचे काम केले होते. तर, रोनित २ वर्ष आमिरचा बॉडीगार्ड होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ronit roy provides security to salman khan aishwarya rai to aamir khan and hollywood celebrities know his story dcp