बॉलिवूडची सुप्रसिद्ध प्रोड्यूसर-डायरेक्टर आणि अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं बुधवारी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पती राज कौशल यांच्या जाण्याने अभिनेत्री मंदिरा बेदीला मोठा धक्का बसलाय. ३० जूनच्या सकाळी जवळपास साडे चारच्या सुमारास राज कौशल यांनी अखेरचा श्वास घेतला आणि या मायावी दुनियेचा निरोप घेतला. मृत्यूपूर्वी राज कौशल एक खास गोष्टीचं प्लॅनिंग करत होते. पण त्यांचं हे प्लॅनिग पूर्ण होण्याआधीच त्यांना मृत्यूनं गाठलं.
राज कौशल यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळात पत्नी अभिनेत्री मंदिरा बेदीने साथ निभवली. अभिनेत्री मंदिरा बेदी आणि अभिनेता रोनित रॉय हे दोघेही खूप जवळचे मित्र-मैत्रीण आहेत. राज कौशल यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अभिनेता रोनित रॉय मंदिरा बेदीला सावरताना दिसून आला. पण त्याला सुद्धा मोठा धक्का बसलाय. रोनित रॉयला ज्यावेळी राज कौशल यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळी तो गोव्यात होता. बातमी कळल्यानंतर रोनित रॉय गोव्याहून मुंबईसाठी रवाना झाला. यावेळी माध्यमाशी बोलताना त्याने राज कौशल यांच्याबाबती हा खुलासा केलाय.
राज कौशल यांना अभिनेता रोनित रॉयसोबत एका प्रोजेक्टवर काम करायचं होतं. गेल्या मे महिन्यातच त्या दोघांची भेट झाली होती. राज कौशल हे एक वेब सीरिज बनवत होते. या प्रोजेक्टची शूटिंग सुद्धा सुरू झाली होती. या वेब सीरिजला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याबाबत राज कौशल यांचा विचार सुरू होता, असं अभिनेता रोनित रॉय याने माध्यमाशी बोलताना सांगितलं.
या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता रोनित रॉयला पाहण्याची राज कौशल यांची इच्छा होती. या वेब सीरिजच्या पहिल्या पार्टमधील काही भाग अभिनेता रोनित रॉयसोबत शूट करावं असं राज कौशल यांना वाटत होतं. इतकंच नव्हे तर या वेबसीरिजमध्ये पडद्यामागे राहून एका मास्टरमाइंडच्या भूमिकेत रोनित रॉयने काम करावं, अशी देखील त्यांची इच्छा होती. या सीरिजच्या शेवटी रोनित रॉयचा चेहरा दाखवण्याचं प्लॅनिंग देखील राज कौशल यांनी केलं होतं.
‘अक्कड बक्कड’ असं या वेब सीरिजचं नाव होतं. ही एक क्राईम ड्रामा सीरिज होती. या सीरिजबाबत राज कौशल यांना इतर प्रोड्यूसरसोबत काही अडचणी आल्या होत्या. त्यानंतर चक्रीवादळ आलं. त्यामूळे या सीरिजचं शूटिंग अडकलं होतं.
राज कौशल यांची ही इच्छा पूर्ण होण्याआधीच त्यांचं निधन झालं. राज यांची शेवटची पोस्ट रविवारची होती. गेल्या रविवारी त्यांनी मित्रांसोबत एक पार्टी एन्जॉय केली होती. त्याचे काही फोटोज त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जहीर खान, नेहा धूपिया आणि अंगद बेदी दिसून येत आहेत.