‘रूअफजा’ या प्रसिद्ध पेयाबाबत ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपटातील अवमानकारक संवादाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या टीव्हीवरील प्रदर्शनास बंदी घातली असून, चित्रपटगृहासाठी ही बंदी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती मनमोहनसिंह यांनी चित्रपटाचा दिग्दर्शक, निर्माता आणि संवाद लेखक यांना नोटीस बजावली असून, सदर प्रकरणाची सुनावणी १६ जुलै रोजी निश्चित केली आहे
अवमानकारक संवादाच्या तक्रारीनुसार चित्रपटाचे निर्माते, एजंट, प्रतिनिधी आणि संबंधित सर्व जबाबदार व्यक्तिंना सदर चित्रपट होम व्हिडिओ, केबल टीव्ही किंवा दूरचित्रवाणी आणि अशा प्रकारच्या अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे प्रदर्शनास बंदी घालण्यात आली आहे. अवमानकारक चित्रिकरणाचा भाग काढून चित्रपट व्हिडिओ स्वरूपात किंवा टिव्हीवर प्रदर्शनास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
‘रूअफजा’ पेयाची निर्मिती करणा-या हमदर्द नॅशनल फाउंडेशनद्वारा दाखल केलेल्या खटल्यावर न्यायालयाने हा आदेश जारी केला. भारत आणि भारताबाहेर प्रसिद्ध असलेल्या ‘रूअफजा’ या यूनानी पेयाबाबत  ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपटात अवमानकारक संवाद असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा