जान्हवी कपूर, राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रुही’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे. या चित्रपटाच्या शेवटी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मॅनेजरला क्रेडिट देण्यात आलं आहे.

बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सलियान हिला ‘रुही’ चित्रपटाच्या शेवटी क्रेडिट दिलं आहे. याचं कारण असं आहे की, दिशा सुशांतसोबतच अभिनेता वरुण शर्माचीही मॅनेजर होती.


मुंबईमध्ये एका पार्टीदरम्यान इमारतीरून पडून तिचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांतसिंहने आत्महत्या केली.
दिशाच्या मृत्युनंतर सुशांतला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यामुळे सुशांत अस्वस्थ होता.तिच्या मृत्युनंतर त्याने दिशाला श्रद्धांजली वाहणारी आणि तिच्या कुटुंबियांचं सांत्वन करणारी पोस्टही शेअर केली होती. ज्यात तो म्हणाला होता, “ही खरंच खूप अस्वस्थ करणारी बातमी आहे. मी दिशा आणि तिच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे. दिशाच्या आत्म्याला शांती लाभो.”

अभिनेता वरुण शर्मानेही तिचा फोटो पोस्ट करत तिला श्रद्धांजली वाहिली होती.

‘रुही’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याच्यावर प्रेक्षक समीक्षकांच्या मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. अभिनेता राजकुमार राव वरुण शर्मा आणि जान्हवी कपूर हे आ चित्रपटात एकत्र पाहायला मिळत आहेत.

Story img Loader