करोना काळामुळे अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होते. मात्र, अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुन्हा चित्रीकरण पूर्वपदावर येताना दिसत आहे. आता अनेक नवीन आणि दर्जेदार चित्रपट आपल्याला येत्या काळात पाहता येणार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाला पाहण्याची उत्सुकता आहे.
बॅालीवुडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह आणि युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी या दोघांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव येणार आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं भाष्य म्हणाली…
‘रूप नगर के चीते’ हा चित्रपट दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं आयुष्य कसं बदलंत. म्हणजेच दोन वेगवेगळ्या शहरात विरोधाभासी जीवन यात पाहायला मिळणार आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत.
आणखी वाचा : छोट्या पडद्यावरील ही बोल्ड अभिनेत्री चक्क विकतेय मासे?
पुणे आणि बंगळूरु शहर परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. प्रेक्षकांसाठी ही हटके कलाकृती आणण्यासाठी आम्ही पण तितकेच उत्सुक असल्याचे मनन शाह आणि विहान सूर्यवंशी सांगतात. ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत काम केल्याचा आनंद आणि समाधान हे दोघंही व्यक्त करतात.