बहुचर्चित आणि प्रतिक्षीत ‘रॉय’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूड अभिनेता रणबीर कूपरच्या हाणामारीच्या दृश्याने ट्रेलरची सुरूवात होते. त्यानंतर ‘कबिर’ नावचे पात्र साकारणारा अभिनेता अर्जुन रामपाल दृष्टीस पडतो. एका चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारणारा अर्जुन रामपाल आयशा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. आयशाची व्यक्तीरेखा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस साकारत असून चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत असल्याचे ट्रेलरवरून निदर्शनास येते. आयशा आणि टिया या दुहेरी भूमिकेत जॅकलीन आहे. आयशा एक महिला चित्रपट दिग्दर्शक असून तिच्या प्रेमात पडलेला अर्जुन रामपाल आणि कलेचा व्यासंग असणाऱया टियाच्या प्रेमात पडलेला रणबीर कपूर असा हा प्रेमाचा त्रिकोण नजरेस पडतो. प्रेम आणि एका बाजूला चोरीच्या प्रकरणावरून निर्माण होणारी गुंतागुत ट्रेलरचा सपेन्स वाढवणारी आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2014 रोजी प्रकाशित
पाहा ‘रॉय’चा ट्रेलर: रणबीर, जॅकलिन, अर्जुन रामपाल प्रेमाचा त्रिकोण?
बहुचर्चित आणि प्रतिक्षीत 'रॉय' चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूड अभिनेता रणबीर कूपरच्या हाणामारीच्या दृश्याने ट्रेलरची सुरूवात होते.

First published on: 17-12-2014 at 06:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roy trailer jacqueline fernandez locks lips with ranbir kapoor arjun rampal