‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही जगातील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. जबरदस्त कथानकामुळे गाजलेल्या या मालिकेने एमिलिया क्लार्क, सोफी टर्नर, किट हॅरिंगटन, मॅसी विलिअम्स यांसारख्या अनेक लहान-मोठय़ा कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. परंतु या सर्वात अभिनेता पीटर डिंकलेज याने विशेष लोकप्रियता मिळवली. या पीटर डिंकलेजसारखाच हुबेहूब दिसणारा एक व्यक्ती पाकिस्तानात सापडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या २५ वर्षीय व्यक्तीचे नाव ‘रोजी खान’ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचीही उंची पीटर डिंकलेज इतकीच म्हणजे ४ फूट २ इंच आहे. त्यालाही अभिनयाची फार आवड आहे. इतकेच नव्हे तर तोही पीटरप्रमाणेच चित्रपटात हिरो बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून पाकिस्तानातील एका लहानशा खेडय़ातून पळून कराचीमध्ये आला. अभिनय करण्याच्या उद्देशाने आलेला रोझी कराचीमधील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सफाई कर्मचाऱ्याचे काम करतो.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ची जबरदस्त फॅन असलेली एक मुलगी आपल्या आईबरोबर या हॉटेलमध्ये आली होती. दरम्यान, तिने रोझी खानला टेबल पुसताना पाहिले आणि त्याला पाहून ती एकदम पीटर डिंकलेज असे ओरडली. तिचा आरडाओरडा पाहून हॉटेलमधील इतर ग्राहक अवाक झाले. त्यानंतर तिने त्याच्याबरोबर एक छायाचित्र काढले, हे छायाचित्र इंटरनेवर इतके व्हायरल झाले की त्यानंतर केवळ रोझी खानला पाहण्यासाठी लोक त्या हॉटेलमध्ये गर्दी करू लागले. तसेच या व्हायरल छायाचित्रामुळे हॉलीवूड सुपरस्टार पीटर डिंकलेजचा भाऊ  पाकिस्तानात टेबल पुसतो अशी चर्चा जगभरात सुरू झाली. कधीकाळी केवळ पाच हजारांसाठी हॉटेलमध्ये टेबल साफ करणारा रोझी पाहता पाहता एक स्टार म्हणून ओळखला जाऊ लागला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे पीटर डिंकलेज आणि रोझी खान यांचे केवळ चेहरे एकसारखे नाहीत तर त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना एकसारख्या आहेत. केवळ ४ फूट २ इंच उंची असलेला पीटरदेखील कधीकाळी एखाद्या सहकलाकाराची भूमिका मिळावी यासाठी अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने चित्रपट स्टुडिओमध्ये सफाई कामगाराची नोकरी करत होता. परंतु पुढे त्याच्या अफलातून अभिनय शैलीमुळे त्याला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि आज तो जगातील सर्वात महागडय़ा अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.