दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत होते. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर चाहते RRR चित्रपटाचे रिव्ह्यू देत आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याला RRR चित्रपटातलं सगळ्यात जास्त काय आवडलं हे सांगत आहे. RRR चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी थिएटरमध्येच नाचत गाजत चित्रपट पाहिला त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
RRR देशभरात ५ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली. चित्रपटाने बाहुबलीचा देखील रेकॉर्ड मोडला आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशीही बक्कळ कमाई केली आहे. ५५० कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा चौथ्या दिवशी ओलांडला आहे. चित्रपटाला सुपरहिटचा दर्जा मिळवण्यासाठी सुमारे ११०० कोटींचा टप्पा पार करावा लागेल असे सांगण्यात येत आहे. आरआरआरच्या हिंदी व्हर्जनने ९२ कोटींच्या जवळपास कमाई केल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट लवकरच १०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘RRR’ चित्रपटाने अनुपम खेर यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या पहिल्या सोमवारच्या कलेक्शनचा रेकॉर्डही मोडला आहे. RRR ने पहिल्या सोमवारी १६ ते १८ कोटींची कमाई केली. तर दुसरीकडे, ‘द काश्मीर फाइल्स’ने १५. १०कोटी कमावले होते.
‘RRR’ चित्रपटाने जगभरात ५०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे आणि पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २२३ कोटींचे कलेक्शन होते. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त आलिया भट्ट आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे.