प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा बहुचर्चित चित्रपट ‘RRR’ च्या प्रदर्शनाची तारीख करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. अशातच आता प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाच्या विरोधात तेलंगणा येथे पीआयएल अर्थात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यासोबत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणीही करण्यात आली आहे.

‘टॉलिवूड डॉट नेट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘RRR’च्या विरोधात ही जनहित याचिका तेलंगाणामधील पश्चिम गोदावरी येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्यानं दाखल केली आहे. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचं म्हणत या विद्यार्थ्यानं चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी आपल्या याचिकेत केली आहे. या चित्रपटात दोन स्वतंत्र सैनिक अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचं या विद्यार्थ्यानं आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”

चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या या विद्यार्थ्यानं आपल्या याचिकेत या चित्रपटाला सेन्सर सर्टिफिकेट दिलं जाऊ नये आणि प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. या चित्रपटात स्वतंत्र्य सैनिकांचा इतिहास बदलून किंवा मोडतोड करून दाखवण्यात आलं आहे. याप्रकरणी न्यायधीश उज्जवल भूयन आणि वैंकटे्शवर रेड्डी यांनी सुनावणी केली. आता पुढील सुनावणीची प्रतिक्षा आहे. दरम्यान याबाबत दिग्दर्शक राजामौली किंवा त्यांच्या टीमकडून कोणत्याही प्रकरची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

‘RRR’ मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण तेजा यांनी अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम या दोन स्वतंत्र्य सैनिकांच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट सुरुवातीला ७ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता मात्र देशभरात करोना रुग्णाची संख्या झपाट्यानं वाढल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.