‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं आणि काल पार पडलेल्या सोहळ्यात गाण्याने हा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याला नॉमिनेशन मिळाल्यानंतर संपूर्ण भारतीय यंदाच्या ऑस्करसाठी उत्सुक होते. ‘आरआरआर’ चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे जगभरातुन कौतुक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाहुबली चित्रपटाने एसएस राजामौली प्रसिद्धीच्या झोतात आले. त्याआधी त्यांनी मगाधिरा, मक्खी या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच त्यांनी व्हरायटीला दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की ऑस्करमुळे तुम्हाला आता प्रेरणा मिळाली असणार, आता पुढील भाग बघायला मिळणार का? त्यावर दिग्दर्शकाने उत्तर दिले “हो अर्थात, ऑस्कर मिळाल्यानंतर आता आम्ही जोमाने पटकथेच्या कामाला लागलो आहोत. बघू आता काय होतंय ते”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Oscar Awards 2023 : दीपिकाच्या ग्लॅमरस लूकची जोरदार चर्चा; आलिया भट्ट कमेंट करत म्हणाली…

एस.एस.राजामौली, अभिनेता ज्युनिअर एनटीआर व राम चरण ऑस्कर सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. या सोहळ्यातील त्यांच्या लूक समोर आला आहे. ऑस्करसाठी राम चरण व ज्यु. एनटीआरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास लूक केला होता. तर या सोहळ्यातील राजामौलींच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.

राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा चित्रपट २४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. ज्यु. एनटीआर व राम चरण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने केवळ देशभरात नाही तर जगभरात डंका वाजवला होता. ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rrr director ss rajamouli confirm about the sequel after wining oscar award spg
Show comments