‘आरआरआर’ फेम अभिनेता रे स्टीवेन्सन यांचं निधन झालं आहे. रविवारी(२१ मे) इटली येथे त्यांची प्राणज्योत मालवली. ५८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रे स्टीवेन्सन यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
रे स्टीवेन्सन यांच्या निधनावर ‘आरआरआर’ टीमकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. ‘आरआरआर’च्या सोशल मीडिया पेजवरुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. “आमच्या टीमसाठी ही धक्कादायक बातमी आहे,” असं पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनीही इन्स्टा स्टोरीद्वारे त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
रे स्टीवेन्सन यांनी ‘आरआरआर’ चित्रपटात गव्हर्नर स्कॉट बक्सटन ही खलनायिकाची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘आरआरआर’ या एकमेव भारतीय चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. ९०च्या दशकात त्यांनी मालिका व चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
‘आरआरआर’नंतर रे स्टीवेन्सन ‘अॅक्सिडंट मॅन : हिटमॅन हॉलिडे’ या चित्रपटात दिसले होते. त्यांनी ‘थॉर’ व ‘थॉर : द डार्क वर्ल्ड’ या चित्रपटांतही काम केलं आहे.