भारतीय चित्रपटांचे चाहते आज संपूर्ण जगभरात देशभरात पसरले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप यांप्रमाणेच जपान, चीन यांसारख्या देशातही भारतीय चित्रपट आवडीने पाहिले जातात. एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ या चित्रपटाने भारतीयांना वेड लावलेच पण त्यानंतर या चित्रपटाने परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे.

एसएस राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा समावेश असलेली ‘आरआरआर’ची टीम काही दिवसांपूर्वी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जपानमध्ये गेली होती. या दोन्ही स्टार्सचे जपानमध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. १७ दिवसांपूर्वी जपानच्या चित्रपटगृहात ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे

आणखी वाचा : ‘दबंग ४’ बनवण्यासाठी सलमान खान आणि अरबाज उत्सुक पण ‘ही’ आहे मोठी अडचण, दिग्दर्शकाचा खुलासा

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉलिवूडच्या जपानमध्ये प्रदर्शित झालेल्या बड्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली. हा चित्रपट प्रभासच्या ‘साहो’चा रेकॉर्ड मोडत पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. आता या चित्रपटाने आणखीन एक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे.

या १७ दिवसात १.२ लाख लोकांनी जपानमध्ये हा चित्रपट पाहिला आहे. आता या चित्रपटाने आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. ‘आरआरआर’ जपानमध्ये आतापर्यंत १८५ दशलक्ष येन इतकी कमाई केली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाच्या नावावर होता. ‘थ्री इडियट्स’ जपानमध्ये १७० दशलक्ष येन कमाई करत सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. त्यामुळे ‘थ्री इडियट्स’चा हा विक्रम ‘आरआरआर’ने मोडला आहे.

हेही वाचा : ‘आरआरआर’चा जपानमध्येही बोलबाला, पहिल्याच दिवशी मोडला प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाचा ‘हा’ विक्रम

‘आरआरआर’ चित्रपट जपानी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला दिसत आहे. ट्विटरवर जपानमधील प्रेक्षक प्रतिक्रिया देत या चित्रपटाचे खूप कौतुक करत आहेत. एकाने लिहिले, “‘आरआरआर’ हा वर्षातील सर्वोत्तम चित्रपट आहे…नक्की पहा!” तर दुसऱ्याने लिहिले, “या चित्रपटाची कथा, कथेची मांडणी, संवाद, नातू गाणे हे सगळेच उत्कृष्ट आहे.”