सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाची जादू आजही कायम आहे. या चित्रपटातील गाण्यांचे अनेक रिल्स व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाले होते. ‘RRR’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. त्यानंतर आता ‘गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्या’तही ‘RRR’ने डंका मारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाणं बरंच लोकप्रिय झालं. गोल्डन गोल्ब्स पुरस्कार सोहळ्यात आता ‘नाटू नाटू’ हे सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं ठरलं आहे.  ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी गोल्डन ग्लोब्स पुरस्कार मिळाला आहे. परंतु, सर्वोत्कृष्ट नॉन इंग्लिश चित्रपटाचा पुरस्कार मात्र थोडक्यात हुकला आहे. ‘अर्जेंटिना १९८५’ या अर्जेंटिनामधील चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट नॉन इंग्लिश चित्रपट’ कॅटेगरीचा पुरस्कार मिळाला आहे. या कॅटेगरीत ‘आरआरआर’सह ऑल क्विंट ऑन द वेस्टर्न फ्रंट(जर्मनी), अर्जेंटिना १९८५ (अर्जेंटिना), क्लोझ(बेल्जियम), डिसिजन टू लीव्ह(साऊथ कोरिया) या चित्रपटांना नामांकन मिळालं होतं.

हेही वाचा>> Golden Globe Award 2023 मध्ये भारताचा डंका! ‘RRR’चं ‘नाटू नाटू’ ठरलं सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं

गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्यात ‘RRR’ चित्रपटाचं प्रतिनिधीत्व दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी केलं. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

हेही वाचा>> ‘RRR’च्या ऑस्करवारीवर शाहरुखने केली भविष्यवाणी; राम चरणचे आभार मानत म्हणाला….

दरम्यान, जागतिक पातळीवर ‘RRR’ ने १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. याआधी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्डमध्ये राजामौली यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. ‘RRR’ ऑस्करसाठीही सर्व कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट झाला आहे. त्यामुळे आता कोणत्याही एका कॅटेगरीमध्ये हा चित्रपट नॉमिनेट व्हावा अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rrr movie loses golden globe non english film award ss rajamouli kak