‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. यंदा हे गाणं भारताला ऑस्कर मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. अशातच या गाण्याबद्दल आणखी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हे गाणं राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांच्याबरोबर ऑस्करच्या मंचावर लाइव्ह सादर केलं जाईल, असं अकादमीने स्पष्ट केलं आहे.
अकबराबद्दल शिकवलेला इतिहास मूर्खपणाचा; नसीरुद्दीन शाहांचं स्पष्ट मत
संगीतकार एमएम कीरावानी यांनी लाइव्ह परफॉर्मन्ससाठी रिहर्सल सध्या सुरू आहेत, अशी माहिती दिली आहे. तसेच हे गाणं लाइव्ह सादर केलं जाणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. पण, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे दोन्ही स्टार स्टेजवर या गाण्यावर डान्स करतील की नाही, याबद्दल माहिती समोर आलेली नाही.
“जेव्हा मी त्यांच्यासमोर…” नसीरुद्दीन शाहांबरोबर रोमँटिक सीन करण्याबद्दल संध्या मृदुलचं वक्तव्य
२८ फेब्रुवारी रोजी अकादमीने ट्विटरवर यादसंदर्भात घोषणा करत ऑस्कर इव्हेंटमध्ये नाटू नाटू गाण्याचं लाइव्ह सादरीकरण केलं जाईल, अशी माहिती दिली. “राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ‘नाटू नाटू’ ९५ व्या अकादमी पुरस्कारात लाइव्ह,” असं लिहिलं होतं.
दरम्यान, चित्रपटाच्या टीमसाठी ही आनंदाची बाब आहे. हे गाणं थेट ऑस्करच्या मंचावर लाइव्ह सादर केलं जाणार आहे. पण, रामचरण व ज्युनिअर एनटीआर यांच्या डान्सबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.