दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटात त्या दोघांसोबत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील दिसणार आहे. या चित्रपटातलं नुकतचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात ते थोर राष्ट्रपुरुषांना आदरांजली वाहताना दिसत आहेत. हे गाणं आरआरआर सेलिब्रेशन अँथम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्याच नाव ‘शोले’ आहे. या गाण्यात राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. त्यांनी केलेल्या अप्रतिम डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. पण त्या गाण्यात महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहून कलाकार आणि दिग्दर्शकांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत. शोले या गाण्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगत सिंग, राणी लक्ष्मीबाई आणि इतर थोर राष्ट्रपुरुषांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : “माझ्यासारखे सेक्सी कपडे परिधान करणारे…”, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांवर नीना गुप्ता संतापल्या

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

या चित्रपटात एनटीआर ज्युनिअर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट सारखे मोठे कलाकार दिसणार आहेत. ‘आरआरआर’ चित्रपटाचे बजेट सुमारे ४५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २५ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rrr song sholay alia bhatt ram charan and jr ntr pay tributes to national heroes one of them is chhatrapati shivaji maharaj dcp