‘बाहुबली’च्या यशानंतर दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले ज्यूनिअर एनटीआर आणि रामचरण हे दोन सुपरस्टार एकत्र आले. राजामौलींच्या कल्पनेतला हा चित्रपट इतिहासातल्या दोन शूरवीर स्वातंत्र्यसैनिकांवर आधारलेला आहे. काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटाने १००० कोटींहून जास्त रुपयांची कमाई केली आहे. आरआरआरमध्ये आलिया भट्ट, श्रिया सरन आणि अजय देवगन यांनी सहायक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच पार पडलेल्या “टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल”ला एस.एस.राजामौली उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये त्यांना मुलाखतकाराने त्यांच्या चित्रपटांशी संबंधित प्रश्न विचारले. तेव्हा आरआरआरला मिळालेल्या यशाबद्दल बोलताना राजामौली म्हणाले, “भारतासह जगभरात आरआरआर प्रदर्शित झाला, त्यावेळी परदेशातून असा प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. एक-एक करत लोक माझ्याजवळ येऊन माझ्या चित्रपटाविषयी बोलत होते, चित्रपटावर प्रतिक्रिया देत होते. हळूहळू प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्या वाढत गेली. सुरुवातीला शंभर…मग हजार आणि त्यानंतर त्याहून जास्त प्रतिक्रिया माझ्याकडे येत होत्या. लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक, समीक्षक असे चित्रपटसृष्टीशी जोडलेले कित्येक लोक आरआरआरबद्दल मनापासून बोलत होते. त्यावेळी मला माझ्या चित्रपटाबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी जाणवल्या.” याच कार्यक्रमादरम्यान राजामौलींनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणादेखील केली.

दरम्यान राजामौलींचा ‘आरआरआर’ हा चित्रपट ऑस्करसाठी भारताकडून पाठवला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. व्हरायटी या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिकाने या चित्रपटाला ‘बेस्ट ओरिजिनल सॉंग’ आणि ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळू शकते अशी माहिती दिली आहे. तसेच चित्रपटातील मुख्य कलाकार ज्यू. एनटीआर आणि रामचरण यांना या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वात्कृष्ट अभिनेता या श्रेणीमध्ये नामांकन मिळू शकते असेही म्हटले जात आहे. ‘ऑस्कर २०२३’ च्या नामांकनांची यादी जाहीर झाल्यानंतरच सर्वकाही स्पष्ट होणार आहे.

आणखी वाचा – “अभिनेता राम चरणला ऑस्कर द्या…”; चाहत्यांच्या मागणीने धरला जोर

एस.एस.राजामौली सध्या अमेरिकेमध्ये आहेत. अमेरिकमधल्या एका चित्रपटगृहात त्यांनी चाहत्यांसह आरआरआर पाहिला. या स्पेशल स्क्रीनिंगच्या शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rrrs success in abroad was unexpected for ss rajamouli yps
Show comments