Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नसोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. १२ जुलैला दोघांचा मोठ्या थाटामाटात हिंदू पद्धतीने लग्न होणार आहे. त्यामुळे सध्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. लग्नाआधी आणि लग्नानंतर अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या अंबानी कुटुंबातील सदस्य पाहुणे मंडळींना आमंत्रण देताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजय देवगण, अक्षय कुमार यांच्या घरी जाऊन अंबानी कुटुंबाने लग्नाचं आमंत्रण दिलं. अशातच लग्नाआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अंबानी कुटुंबाची भेट घेतली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काल, २८ जुलैला रात्री आरएसएस प्रमुख मोहन भागवत अंबानी कुटुंबाची भेट घेण्यासाठी अँटिलियाला पोहोचले होते. यावेळी मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी मोहन भागवतांचं स्वागत केलं. याचा व्हिडीओ ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानींनी ‘या’ लोकांचा आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा, निमंत्रण पत्रिका आली समोर

या व्हिडीओत, मोहन भागवतांसह उपस्थितीत असलेल्या पाहुण्यांचं मुकेश अंबानी स्वागत करताना दिसत आहेत. तसंच केशरी रंगाच्या कुर्त्यात असलेला अनंत अंबानी खाली वाकून पाय पडताना पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे अंबानी कुटुंबाने मोहन भागवतांचं स्वागत केलं. तसंच अंबानी कुटुंबाने एकत्र येऊन मोहन भागवतांना निरोपही दिला. यावेळीही अंबानी कुटुंबातील सदस्य मोहन भागवतांचे आशीर्वाद पुन्हा एकदा घेताना पाहायला मिळाले.

हेही वाचा – आईप्रमाणेच ईशा अंबानीने देखील IVF द्वारे दिला जुळ्या मुलांना जन्म; खुलासा करत म्हणाली, “ही एक अवघड…”

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी मुकेश अंबानींनी वंचितांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. २ जुलैला सायंकाळी ४.३० वाजता पालघर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात हा सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्याला स्वतः मुकेश अंबानी व पत्नी नीता अंबानी उपस्थित राहणार आहेत.