‘रुबाई’ या काव्य/गीत प्रकाराने आपला स्वतंत्र ठसा साहित्यात उमटविला आहे. चार ओळींच्या काव्यपंक्तीत एखादा विषय व्यक्त केलेला असतो. ‘रुबाई’ उर्दूतील प्रसिद्ध काव्य प्रकार म्हणून ओळखला जातो. आगामी ‘तप्तपदी’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून गीतकार आणि कवी वैभव जोशी यांनी हा काव्यप्रकार मराठी संगीतप्रेमी आणि रसिक श्रोत्यांच्या भेटीस आणला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या ‘दृष्टिदान’ या कथेवर हा चित्रपट आहे. गुढीपाडव्याला हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होत आहे.
गीतकार-कवी वैभव जोशी यांनी ‘अशी ये नजिक’, ‘ही गर्द अमावस नाही’, ‘हुल देऊन गेला पाऊस’, ‘कुठवर तू सोबत’, ‘मी फुंकर’ अशा सहा गाण्यांच्या माध्यमातून ‘रुबाई’ सादर केली आहे. ही गाणी सुमित बेल्लारी आणि रोहित नागभिडे यांनी संगीतबद्ध केली असून सावनी शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी ही गाणी गायली आहेत.
मराठीत शुक्रवार सोडून तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी प्रदर्शित होणारा ‘तप्तपदी’ हा पहिलाच चित्रपट आहे. नाताळ, दिवाळीत नव्या चित्रपटाचे प्रदर्शन होते. मग हिंदू नववर्षांच्या पहिल्या दिवशी, गुढीपाडव्याला आपण चित्रपट प्रदर्शित करावा, असा आमचा उद्देश असल्याचे दिग्दर्शक सचिन नागरमोजे आणि निर्माते हेमंत भावसार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा