Rubina Dilaik : सिनेमा दिग्दर्शक आणि फूड तसंच इतर रिअॅलिटी शोची परीक्षक फराह खान आता सोशल मीडियावरही सक्रिय झाली आहे. फराह अनेकदा तिच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्धी बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींसह ती स्वयंपाकाचे व्हिडीओ पोस्ट करत असते. विकी आणि अंकिता लोखंडे यांच्या घरातला व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसंच रुबिना दिलैकसह फराहने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी रुबिनाने फराह खानला नॉनव्हेज खाऊ नकोस माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे नॉनव्हेज खाऊन असं म्हणत एक सल्ला दिला आहे.
रुबिनाने नेमकं काय म्हटलं आहे?
“अभिनव आणि मी सात वर्षांपासून मांसाहार, विशेषतः चिकन खाणं बंद केलं आहे. खरंतर, सुरुवातीला जेव्हा आम्ही दोघंही व्यायाम करायचो, तेव्हा आमचे हातपाय सुजायचे आणि आमचे तळवे जास्त दुखायला लागायचे. त्यावेळी आम्हाला खूप अस्वस्थ वाटायचं. नॉनव्हेजमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. मग अभिनव आणि मी चिकन सोडण्याचा निर्णय घेतला आणि चिकन सोडल्यानंतर आम्हाला स्वतःमध्ये चांगले बदल जाणवू लागले.” असं रुबिनाने सांगितलं.
रुबिनाने मांसाहार बंद करण्याचा सल्ला फराह खानला दिला आहे
रुबिनाने पुढे फराह खानला सांगितले की जर तू मांसाहार करणं बंद केलंस तर तुझ्या शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. फराह खानला नॉनव्हेज आवडतं ती ते सोडेल की नाही माहीत नाही पण तिने रुबिनाला विचारलं की मी मासेही खाऊ नयेत का? त्यावर रुबिना म्हणाली तुला आवडत असेल तर तू मासे खाऊ शकतेस. पण तू चिकन खाणं बंद कर. आता रुबिनाचा हा सल्ला फराह खान मान्य करणार असं दिसतं आहे. कारण फराह खानने तिच्या शेफला म्हणजेच दिलीपलाही सांगितलं की चिकनचा जास्त अंतर्भाव जेवणात करु नकोस.
फराह खानने दिलीपला काय सांगितलं?
रुबिनाने दिलेल्या सल्ल्याचा विचार करून फराह खान म्हणाली की, ती पुढे जाऊन नक्कीच चिकन सोडण्याचा प्रयत्न करेन तसेच फराहने तिचा शेफ दिलीपलाही समजावून सांगितलं की आतापासून त्याने जेवणात कमी चिकन शिजवावं. खरंतर, फराह खान बनवत असलेले यखनी पुलाव आणि रोस्ट चिकन हे पदार्थ बॉलिवूड सेलिब्रिटींना खूप आवडतात. आता फराह चिकन पूर्ण बंद करणार असेल तर मात्र हे पदार्थ तिच्यासह बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजनाही खायला मिळणार नाहीत.