टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या पोस्टही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. आताही काहीसं असंच घडलं आहे. जास्मिन भसीनचा लग्नाच्या चुड्यातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या फोटोवरून जास्मिननं गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरू आहेत.
जास्मिननं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावरून तिचं लग्न झाल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. एवढंच नाही तर जास्मिनचे चाहतेही तिचा हा फोटो पाहून गोंधळले आहेत कारण या फोटोमध्ये जास्मिनच्या हातात लाल रंगाच्या चुडा दिसत आहे. त्यामुळेच जास्मिननं गुपचूप लग्न केल्याचं बोललं जात होतं. पण आता या फोटोमागचं सत्य आता समोर आलं आहे.
जस्मिन भसीनचा व्हायरल होत असलेला हा फोटो तिच्या आगामी पंजाबी चित्रपट ‘हनीमून’मधील लूक आहे. या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच सुरू झालं आहे. हा फोटो शेअर करताना जास्मिननं लिहिलं, ‘एका नव्या प्रवासाची सुरुवात. गिप्पी ग्रेवाल आणि मी लवकरच तुमच्या भेटीला येत आहोत.’ जास्मिनच्या या फोटोवर कमेंट करताना तिचे चाहते तिचं कौतुक करताना तसेच तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
जास्मिनच्या कामबद्दल बोलायचं तर तिने ‘टशन-ए-इश्क’ आणि ‘दिल से दिल तक’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती ‘खतरों के खिलाडी ९’ आणि ‘बिग बॉस १४’मध्येही सहभागी झाली होती. सोशल मीडियावर ती अनेकदा अभिनेता अली गोनीसोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असते.