बॉलिवूड अभिनेता अरबाज खान लवकरच पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. गेल्यावर्षी अरबाजनं पत्नी मलायकाशी घटस्फोट घेतला. त्यानंतर अरबाज आणि मॉडेल जॉर्जिया अँड्रीयानी एकमेकांना डेट करू लागले. अनेक कार्यक्रम आणि पार्टीमध्येही अरबाज आणि जॉर्जिया एकत्र दिसले. आता हे दोघं २०१९ मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अरबाज आणि जॉर्जियाच्या नात्याला खान कुटुंबानं मान्यता दिली असल्याचं समजत आहे. अरबाज आणि मलायका गेल्या १८ वर्षांपासून एकत्र नांदत आहेत. मात्र गेल्यावर्षी या दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटानंतर अनेक अफवांना पेव फुटलं मात्र या दोघांनीही या अफवा खोडून काढल्या.

घटस्फोटानंतरही अनेक कौटुंबिक कार्यक्रमासाठी अरबाज आणि मलायका एकत्र आले. घटस्फोट झाला असला तरी या दोघांनीही आपली मैत्री मात्र कायम टिकवली.
पण आता मात्र अरबाज प्रेयसी जॉर्जिया अँड्रीयानीशी विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत घटस्फोटानंतर मी पूर्वीपेक्षाही खूप शांततापूर्ण जीवन जगत आहे. माझ्या आजूबाजूलाही केवळ शांतता नांदत आहे असं मलायका म्हणली होती.

Story img Loader