अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तंत्रज्ञानाचा वापर करून एका मॉडेलच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आणि तो आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनी रश्मिकाची बाजू घेत तिचा खोटा व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. अशातच आता रश्मिकाचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडाने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रश्मिका मंदानाने स्वतःच्या ‘त्या’ आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओबाबत सोडलं मौन, म्हणाली…

रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ आणि इतर कंटेंट काढून टाकण्याच्या केंद्राच्या कारवाईबद्दल एक बातमी विजय देवरकोंडाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली. त्याबरोबरच त्याने “हे असं कोणाच्याही बाबतीत घडायला नको. लोकांसाठी सहज उपलब्ध असलेली कार्यक्षम सायबर शाखा लोकांना अधिक सुरक्षित करेल,” असं लिहिलं.

रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओवर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय रीलिव्हिंग ड्रेस घातला आहे.

दरम्यान, तपासाअंती असं आढळलं की हा व्हिडीओ बनावट आहे. या व्हिडीओत रश्मिका मंदानाचा चेहरा मॉर्फ करून लावण्यात आला आहे. हा मूळ व्हिडीओ एका मॉडेलचा आहे. या व्हिडीओत दिसणारी मुलगी ही रश्मिका नाही तर झारा पटेल ही ब्रिटिश-भारतीय तरुणी आहे. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडीओवर लावण्यात आला.

या प्रकरणी रश्मिकाने प्रतिक्रिया देत हे सगळं धक्कादायक असल्याचं म्हटलं होतं. “माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालंय. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे,” असं ती म्हणाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rumoured boyfriend vijay deverakonda reacts to rashmika mandanna deepfake video hrc
Show comments