आपल्यात तसले काहीही नसून आपण केवळ एकमेकांचे चांगले मित्र असल्याचा दावा करणारी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही प्रसिद्ध बॉलिवूड जोडी रविवारी रात्री (१३ एप्रिल) मुंबईतील एका आलिशान रेस्तरॉंबाहेर दिसली. ‘राम-लीला’ची ही जोडी संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव-मस्तानी’ या आगामी चित्रपटात काम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या रणवीर सिंग ‘किल दिल’ चित्रपटात व्यस्त आहे, तर दीपिका पदुकोण ‘हॅपी न्यू इयर’ या फराह खानच्या चित्रपटात व्यस्त आहे. रेस्तराँत सॅन्डो बनियान, जिन्स आणि डोक्यावर टोपी असा कॅज्युअल वेअर परिधान करून आलेला रणवीर आपल्या नेहमीच्याच मस्तिखोर मुडमध्ये होता, तर दीपिका पदुकोणचीदेखील काहीशी अशीच वेषभूषा होती. जेवणाचा आनंद घेतल्यानंतर आपल्या मित्रांसह हे दोघे रेस्तरॉंमधून बाहेर पडले आणि गाडीतून निघून गेले.
फोटो अल्बम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Story img Loader