सर्वांचेच लक्ष्य असलेली बॉलीवूडची जोडी रणबीर आणि कतरिना खूप दिवसानंतर एकत्र दिसले. हे दोघेही एक्स मॅनच्या स्क्रिनिंगला एकत्र पोहोचले होते. बॉलिवूड स्टार्ससाठी लाइट बॉक्समध्ये या हॉलिवूड चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते.
 
कारमध्ये असताना रणबीर आणि कतरिनाची एकत्र झलक बघायला मिळाली. स्क्रिनिंगमध्ये या दोघांसह अयान मुखर्जी, अर्जुन कपूर, अरुणोद्य सिंहसह बरेच सेलिब्रेटी उपस्थित होते. रणवीरने राखाडी रंगाचे टी-शर्ट, जिन्स आणि टोपी परिधान केली होती तर तर कतरिना काळ्या टी-शर्टमध्ये दिसली. हे दोघेही ऑडी गाडीतून स्क्रिनिंगस्थळी पोहोचले.
 
यावर्षी रणवीरचा ‘बॉम्बे व्हेलवेट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यामध्ये तो रेट्रो लूकमध्ये दिसणार आहेत. तर कतरिना ‘बँग बँग’ या चित्रपटात हृतिक रोशनसोबत झळकणार आहे.

Story img Loader