बॉलीवूडची बहुचर्चित जोडी रणबीर-कतरिनाने यंदाची दिवाळी बच्चन कुटुंबियांसोबत साजरी केली. ते पहिल्यांदाच एकत्र सर्वांसमोर आले होते. यावेळी शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही उपस्थित होते.
दिवाळी सेलिब्रेशनकरिता रणबीर आणि कतरिना एकाच गाडीतून बच्चन यांच्या घरी गेले होते. कतरिनाने गडद रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर, रणबीर पारंपारिक वेशात दिसला. ट्विटरद्वारे अमिताभ यांनी, चित्रपटसृष्टीतील सहका-यांसोबत दिवाळी साजरा करताना झालेला आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे, शाहरुखनेही ट्विटरद्वारे बच्चन कुटुंबियांचे दिवाळी सेलिब्रेशनसाठी आभार मानले.

Story img Loader