सेलिब्रिटी नेहमीच त्यांचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. एवढंच नाही तर अनेक कलाकारांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीचे आणि आताचे असा कोलाज फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतो. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखता ही येत नाही आहे.

हा फोटो अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. रुपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतली ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकरी ही आश्चर्य चकीत झाले आहे. “अरे देवा, ही मुलगी खूप दूर पर्यंत आली आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचे आभार. माझ्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती मी स्वतः होती आणि स्वत: वर विश्वास ठेवणं हे सर्वात महत्वाच आहे, असे रुपाली म्हणाली.

पुढे रुपाली म्हणाली, “खूप मोठा प्रवास आहे आणि त्यात अडथळे देखील येणार आहेत. पण कशाची ही खंत नाही..आता घडणाऱ्या गोष्टी या आधी सारख्या नाही, पण लढण्याची शक्ती अजूनही तशीच आहे. स्वप्न देखील तिच आहेत.”

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

रुपालीने अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सुमित राघवन सोबत रुपालीने ‘बडी दुरसे आये है’ या मालिकेत एकत्र काम केले आहे. सध्या रुपाली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे.

Story img Loader