छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, यश, अप्पा, कांचन हे सर्व कलाकार घराघरात प्रसिद्ध आहे. त्यात संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही घराघरात प्रसिद्ध आहे. नुकतंच संजनाने अप्पांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. आप्पांची भूमिका साकरणारे अभिनेते किशोर महोबोले यांच्या वाढदिवसानिमित्त तिने ही खास पोस्ट शेअर केली आहे.
रुपाली भोसले ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. अभिनेते किशोर महोबोले यांच्या वाढदिवसानिमित्त तिने एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. यात तिने अप्पांसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आप्पा. गेल्या १४ ते १५ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. या तरुणाकडे एक चांगली गोष्ट म्हणजे सातत्य. सदैव हसतमुख चेहरा आणि सकारात्मक उर्जा यांच्यासाठी वय ही एक फक्त संख्या आहे. आणि हो त्यांनी ते वेळोवेळी सिद्ध देखील केलं आहे.
किशोर महाबोले तुम्ही असेच चमकत राहा. अशीच सकारात्मक उर्जा पसरवत राहा आणि तुमच्यातील लहान मुलाला असच जिवंत ठेवा.. आय लव्ह यू आप्पा”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रुपालीने तिच्या या पोस्टद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रुपालीने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे. तसेच त्याची ही पोस्ट प्रचंड चर्चेत असल्याचेही पाहायला मिळत आहे.