काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असे म्हणत अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. त्यानंतर हे अनुराधा या सीरिजच्या प्रमोशसाठी सुरु असल्याचे कळले. दरम्यान, या सीरिजचा जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मात्र, या सीरिजवर रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रुपाली चाकणकर यांची ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पत्र लिहित तक्रार केली आहे. त्या म्हणाल्या, एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमांमधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. रुपाली यांनी सीरिजच्या दिग्दर्शकाला नोटीस पाठवली आहे. त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथा आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच आले समोरा-समोर अन्…

आणखी वाचा : अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी ट्विंकलने दोनदा केला होता साखरपुडा!

‘अनुराधा’ या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘अनुराधा’च्या निमित्ताने संजय जाधव वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत असून हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेबसीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांचे संगीत लाभले आहे. तर संकलनाचे काम अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी पाहिले असून कला दिग्दर्शक सतीश चिपकर आहेत.