उर्फी जावेदचे अतरंगी कपडे आणि गौतमी पाटीलचा डान्स या महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असणाऱ्या गोष्टी आहेत. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून व गौतमीच्या अश्लील डान्सवर बरंच राजकारणही झालं. गौतमीने माफी मागितली, तर दुसरीकडे उर्फी विरुद्ध भाजपा नेत्या चित्रा वाघ हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. अशातच या दोघींबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चाकणकर काय म्हणाल्या, ते पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – आराध्या बच्चन संदर्भातील याचिकेवर पार पडली सुनावणी; कोर्टाने दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

गौतमी पाटील आणि उर्फी जावेद महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विकृतीकरण करत आहेत? असा प्रश्न रूपाली चाकणकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्या टीव्ही ९ शी बोलताना म्हणाल्या, “गौतमी पाटील करतेय ते नृत्य नाही, पण या प्रकरणात राज्य महिला आयोगाला ज्या तक्रारी येतात, त्या तक्रारींची दखल घेऊन राज्य महिला आयोग संबंधित व्यक्ती, संबंधित विभाग किंवा संस्था यांच्याकडे पाठवत असतात. पण राज्यघटनेने तुम्हाला, मला जो व्यक्ति स्वातंत्र्याचा, भाषा स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे कोणी काय घालावं, कोणी काय बोलावं, कोणी काय खावं, हे कोण कुणाला सांगू शकत नाही.”

हेही वाचा –लग्नासाठी कसा जोडीदार हवा? गौतमी पाटील म्हणाली, “मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा नको तर…”

पुढे चाकणकर म्हणाल्या, घटना तुम्हाला, मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असताना शील व अश्लील याची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट अश्लील वाटत असेल तर दुसऱ्याला ती गोष्ट शील वाटते. त्यामुळे ही परिभाषा स्थळ, काळ वेळपरत्वे बदलत राहते. यासंदर्भात कोणतीही स्पष्ट व्याख्या कायद्यात नाही. या दोघीही तुमच्या दृष्टीकोनातू अश्लील वाटत असल्या तरी दुसऱ्यांच्या नजरेत त्या शील असू शकतात. म्हणून आपण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही, पण त्यांना समज देऊ शकतो. कायदा व सुव्यवस्था पाहता त्यासाठीचे काही परिमाण ठरले आहेत, त्यापलीकडे जाऊन आपण कोणतीही कारवाई करू शकत नाही,” असं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali chakankar on gautami patil and urfi javed distorting maharashtra culture hrc