देशात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस बाधितांचे आकडे मोठे होत चालले आहेत. अनेक चित्रपट, मालिकेतल्या कलाकारांनाही करोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ‘अनुपमा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी रुपाली गांगुली हिलाही करोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडियावर भन्नाट शब्दात याबद्दल माहिती दिली आहे.

अभिनेत्री रुपाली गांगुली आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिते, “अशा पद्धतीने पॉझिटिव्ह नव्हतं व्हायचं. ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, जब हुआ, तब हुआ छोडो ये ना पुछो…सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि माझ्यावर, माझ्या परिवारावर, अनुपमा परिवारावर प्रेमाचा वर्षाव करत राहा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rups (@rupaliganguly)

ही लागण कशी, कधी, कुठे झाली हे तिला माहित नसल्याचंही तिने आगळ्या वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. सगळी काळजी घेऊनही कसा काय झाला कोणास ठाऊक असंही ती पुढे म्हणते. ‘अनुपमा’ मालिकेच्या टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फक्त रुपालीच नाही तर या मालिकेतला अजून एक अभिनेता आशिष मल्होत्रा यालाही करोनाची लागण झाल्याचं कळत आहे. हा कलाकार मालिकेत परितोष ही रुपालीच्या ऑनस्क्रिन मुलाची भूमिका साकारत आहे.

रुपालीला करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत आणि तिची प्रकृती उत्तम असल्याचं टीमकडून सांगण्यात आलं. तसंच ती सर्व प्रकारची काळजी घेत गृहविलगीकरणात असल्याचंही सांगण्यात आलं आहे. महानगरपालिकेला याबाबत माहिती देण्यात आली असून सेटचं सॅनिटायझेशनही करण्यात आलं आहे.

या मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी सांगितलं की, ते रुपाली, आशिष तसंच संपूर्ण टीमच्या संपर्कात आहेत. टीमची सुरक्षा हीच मुख्य जबाबदारी आहे.

अनुपमासोबतच राजन हे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘मन की आवाज प्रतिग्या २’ अशा मालिकांचेही निर्माते आहेत.

Story img Loader