सध्या सर्व महाराष्ट्रात चर्चा आहे ती केवळ आणि केवळ ‘सैराट’ या चित्रपटाची. या चित्रपटाच्या गाण्यांनी सर्वांना याडं लावून टाकलं आहे. अगदी चित्रपट पाहात असतानाही लोक चित्रपटगृहात गाणी लागण्यावर नृत्य करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, केवळ मराठी माणूसच नाही तर रशियन लोकही या चित्रपटातील गाण्यावर थिरकायला लागली आहेत.
अजय-अतुल या संगीतकार जोडीने आपल्या संगीताने रशियन लोकांनाही याडं लावलंय. अजय-अतुलने त्यांच्या ट्विटरवर रशियन लोक झिंगाट गाण्यावर नृत्य करत असल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या लोकांना गाण्याचे शब्द कळत नसले तरी त्याचे संगीत मात्र त्यांना त्याच्यावर थिरकण्यापासून रोखू शकले नाही. तर चला पाहूया रशियन लोकांचा सैराट डान्स.

Story img Loader