अभिनेत्री ऋतुजा बागवे ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ऋतुजाने तिच्या उत्तम अभिनयासोबतच सौंदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे. ऋतुजा ही ‘नांदा सौख्य भरे’, ‘तू माझा सांगाती’, ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झाली. ऋतुजा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकतंच ऋतुजाने स्वयंपाकघरात काम करत असताना जखमी झाल्याची माहिती दिली आहे.
ऋतुजाने सोशल मीडियावर पोस्ट करत स्वयंपाकघरात काम करताना भाजल्याचे सांगितले आहे. नुकतंच ‘ई टाइम्स’शी बोलताना तिने याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ही जखम नेमकी कशी झाली? काय झालं? याबद्दलही तिने सांगितले. ऋतुजा म्हणाली की, “मला स्वयंपाक करायला प्रचंड आवडतो. त्यादिवशी मी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काहीतरी पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरचा वापर करत होते.”
“मी सवयीप्रमाणे मिक्सर सुरु केला. पण त्या भांड्यातील गरम द्रवपदार्थ माझ्या हातावर आणि मानेवर उडाला. त्यावेळी देवाच्या कृपेमुळे माझ्या चेहऱ्यावर तो द्रवपदार्थ उडाला. पण त्याचा डाग राहिला नाही. पण हातावर आणि मानेवर मात्र तो द्रवपदार्थ उडाल्याने त्यावर भाजल्याच्या खुणा दिसत आहेत. मी प्रचंड घाबरली होती. कारण एखाद्या अभिनेत्रीसाठी तिचा चेहरा हा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा हा अपघात घडला त्यावेळी मला प्रचंड भीती वाटत होती.” असे ती म्हणाली
एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी माझा चेहरा हा खरोखर महत्वाचा आहे. पण यापुढे मी अधिक जबाबदारीने आणि सावधगिरीने स्वंयपाकघरात वावरेन. या सर्व अपघातामुळे मी एक धडा शिकली आहे. सध्या मी स्वतःची खूप काळजी घेत आहे. वेळेवर औषधे घेणे, योग्य आहार घेणे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजबूत राहणे या सर्व गोष्टी सुरु आहेत, असेही तिने सांगितले.
“आमच्या या प्रवासात तो नसता तर…”, दिग्दर्शक केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान यावेळी बोलताना तिने तिला तिच्या इच्छाशक्तीचा अभिमान असल्याचे सांगितले. ती म्हणाली, “माझ्या शरीराच्या वरच्या भागावर बर्याच ठिकाणी भाजले आहे. पण माझी इच्छाशक्ती मजबूत आहे. त्यामुळेच मी याच्याशी लढू शकतो. एकदा अनन्या हे नाटक करत असताना सेटवरही माझा पाय भाजला होता. पण आता मला असं वाटतंय की मी आता इतकी खंबीर झाली आहे की मला आता प्रत्येक गोष्टीशी निर्भयपणे लढायची सवय झाली आहे. मी येत्या २ ते ३ आठवड्यात पुन्हा काम सुरु करेन.”
“श्रेया, निलेश, भाऊ, सागर, कुशल आणि…”, ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येताच सोनाली कुलकर्णी भावूक
ऋतुजा ही सध्या ‘अनन्या’ या नाटकात काम करत आहे. तिचे हे नाटक फार गाजत आहे. या मालिकेत तिनं एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली आहे. या नाटकातील ऋतुजाच्या कामाचं भरभरून कौतुक होत आहे. ऋतुजानं २००८ मध्ये ह्या गोजिरवाण्या घरात मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
त्यानंतर ती स्वामिनी, मंगळसूत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये झळकली होती. ऋतुजाला ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. यात तिने स्वानंदी देशपांडे ही भूमिका साकारली होती. ही मालिका २०१५ मध्ये झी मराठीवरून प्रसारित होत होती. त्यानंतर ऋतुजानं २०२१ मध्ये प्रसारित झालेल्या चंद्र आहे साक्षीला या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. या मालिकेत तिच्याबरोबर सुबोध भावे, आस्ताद काळे हे कलाकार होते. ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती.