क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड व उत्कर्षा पवार यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ऋतुराजने पत्नी उत्कर्षाबरोबरचा फोटो शेअर केल्यानंतर त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेरीस त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. शनिवारी (३ मे) ऋतुराज व उत्कर्षाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऋतुराजवर सोशल मीडियावरद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋतुराज व उत्कर्षाने डेस्टिनेशन वेडिंग केलं. त्यांनी लग्नासाठी महाराष्ट्रातील एका सुंदर ठिकाणीची निवड केली. महाबळेश्वरमधील एका रिसॉर्टमध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. ऋतुराजच्या लग्नानंतर अभिनेत्री सायली संजीवने या दोघांच्या लग्नाचा फोटो शेअर केला. यापूर्वीच ऋतुराज व सायलीच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण प्रत्यक्षात या दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नातं होतं.

आणखी वाचा – ना डिझायनर कपडे, ना अवाढव्य खर्च; ऋतुराज गायकवाडच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, साधेपणाने वेधलं लक्ष

सायलीने ऋतुराज व उत्कर्षाच्या फोटो शेअर करत त्यांना आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आता सायलीपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्री ऋतुराजच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट केली आहे. श्रेया बुगडेने कमेंट करत त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेया कमेंट करत म्हणाली, “दोघांचंही खूप अभिनंदन”. शिवाय नेटकरीही त्याचं अभिनंदन करत आहेत.

आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

ऋतुराज व उत्कर्षा यांचं लग्न त्यांचे नातेवाईक व जवळची मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडलं. पण या दोघांनी लग्नापूर्वीचे कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने केले होते. अवाढव्य खर्च करणं ऋतुराजने टाळलं. त्यांच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आल्यानंतर ऋतुराज व उत्कर्षाच्या साधेपणाने लक्ष वेधून घेतलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruturaj gaikwad wedding photos goes viral on social media after sayali sanjeev shreya bugade congratulate cricketer see details kmd