‘साजन’ चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला. बोकाडे यांना श्वसन प्रक्रियेत अडथळा येत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘साजन’, ‘प्रहार’, ‘सनम तेरी कसम’ आणि ‘धनवान’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. त्यांच्यामागे दिव्या आणि किरण या त्यांच्या दोन मुली आणि मुलगा कृष्णा असा परिवार आहे.

Story img Loader