गायिका व अभिनेत्री सबा आझाद अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनला डेट करीत आहे. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. अशात सोशल मीडियावर सबा आझादला अनेकदा तिच्या रिलेशनशिपमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र, प्रत्येक वेळी सबा तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. आताही एका नेटकऱ्याला तिनं साध्या शब्दांत चांगलंच फटकारलं आहे.

सबानं काही दिवसांपूर्वीच ‘हू इज योर गाइनेक’ सीजन-२ ची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर याची चर्चा सुरू असताना एका नेटकऱ्याने हा सीजन-२ कधीच येणार नाही, असं मला वाटल्याचं म्हणत तिच्यावर टीका केली होती. तसेच ग्रीक गॉडची अधिकृत गर्लफ्रेंड, असा सबाचा उल्लेख केला होता. त्याच्या याच टीकेला सबानं उत्तर दिलं आहे.

तिनं इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये नेटकऱ्याची कमेंट आणि सबाचं उत्तर दोन्ही दिसत आहे. सबानं यावर लिहिलं आहे, “ठीक आहे, सुमितजी अंकलजी जी! असू शकतं की, तुमच्या जगात जेव्हा व्यक्ती प्रेमात पडतात, तेव्हा ते ???असक्षम??? होतात. त्यामुळे घरमालक त्यांच्याकडे घराचं भाडंही मागत नाहीत आणि स्वत:साठी जेवण घेण्याची गरजही जादूप्रमाणे गायब होते. वा!”

नेटकऱ्याची कमेंट नेमकी काय होती?

‘हू इज योर गाइनेक’ सीजन-२ ची घोषणा केल्यावर एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं होतं, “मला वाटलं होतं की, सीजन-२ कधीच येणार नाही. कारण- या मॅडमजी तर अधिकृतपणे ग्रीक गॉडच्या गर्लफ्रेंड आहेत. मात्र, ‘हू इज योर गाइनेक’चा सीजन-२ पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे.”

दरम्यान, सबा आझादचा ‘हू इज योर गाइनेक’चा सीजन-२ एमएक्स प्लेअरवर प्रीमियरसाठी तयार आहे. २०२३ मध्ये याचा पहिला सीजन आला होता. सबानं २००८ मध्ये मनोरंजन विश्वात पहिलं पाऊल ठेवलं. ‘दिल कबड्डी’ या चित्रपटात तिनं काम केलं होतं. त्यानंतर ‘मुझसे फ्रेंडशिप करोंगे’मध्ये ती दिसली होती. सबानं अनेक चित्रपटांसाठी गाणीसुद्धा गायली आहेत.

२०१३ मध्ये आलेल्या ‘नौटंकी साला’ या चित्रपटासाठी तिनं पहिल्यांदा गाणं गायलं. ‘धक धक करने लगा’ व ‘दिल की तो लग गई’ ही दोन तिची पहिली गाणी चांगलीच प्रसिद्ध झाली. त्यानंतर सबाने ‘कलकत्ता किस’, ‘नींद ना मुझको आये’, ‘देखे मेरी आँखों में जो’ अशी अनेक गाणी गायली आहेत.

Story img Loader