अभिनेता हृतिक रोशन मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेत्री सबा आझादसोबतच्या डिनर डेटचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. सबा आणि हृतिक एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थात हृतिक किंवा सबानं याबाबत अद्याप पुष्टी केलेली नाही. पण हृतिकच्या अगोदर सबा आझाद प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलासोबत ७ वर्ष रिलेशनशिपमध्ये होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार सबा आझाद प्रसिद्ध अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ७ वर्ष दोघंही एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशपमध्ये होते. २०१३ मध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती. अनेक मुलाखतींमध्ये इमादनं त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. पण ७ वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर २०२०मध्ये दोघंही वेगळे झाले. त्यानंतर आता सबाचं नाव अभिनेता हृतिक रोशनशी जोडलं जात आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार हृतिक रोशन आणि सबा आझाद त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले होते. पहिल्या भेटीनंतर दोघंही एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. पण काही दिवसांपूर्वीच डिनर डेटनंतर एकत्र स्पॉट झाल्यानं ही गोष्ट पहिल्यांदाच समोर आली. दरम्यान ही भेट आणि डिनर काही निमित्त असल्याचं समोर आलं. पण तोपर्यंत सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान हृतिक रोशननं २०१४ साली पत्नी सुझान खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याचं नाव काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वी तो हॉलिवूड अभिनेत्री सामंथा लॉकवूडसोबत दिसल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच तो अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saba azad was live in relationship with naseeruddin shah son for 7 years mrj