इटलीतील लेक कोमा परिसरातील एका शानदार व्हिलामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी लग्न केलं. दीप-वीरचं लग्न यंदाच्या वर्षातलं सर्वात मोठं लग्न असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या लग्नातील प्रत्येक गोष्टीची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. लग्नातील रितीरिवाजापासून ते दीप-वीरच्या कपड्यांपर्यंत साऱ्यांच गोष्टी खास होत्या. मात्र या लग्नात सर्वात जास्त चर्चा रंगली ती दीपिकाच्या साडी आणि मंगळसूत्राची. दीपिकाची साडी प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र ही साडी सब्यासाचीने डिझाइन केली नसल्याचा खुलासा खुद्द त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१४ -१५ नोव्हेंबर रोजी रंगलेल्या विवाहसोहळ्यामध्ये दीपिकाने कोंकणी लग्नात घातलेली कांजीवरमची सिल्क साडी डिझाइनर सब्यासाची यांनी डिझाईन केली केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र ‘ही साडी मी डिझाइन केली नसून ती केवळ माझ्याकडे काही कारागिरी करण्यासाठी देण्यात आल्याचं’ त्यांनी म्हटलं आहे.

‘कोंकणी पद्धतीनुसार, नववधूची आई आपल्या मुलीला लग्नात साडी भेट देते. त्यानुसार दीपिकाच्या आईने उज्ज्वला यांनी दीपिकाला ही साडी गिफ्ट केली होती. मात्र त्यावर थोडीशी कारागिरी करण्यासाठी ती माझ्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे ही साडी मी डिझाइन केलेली नाही. ही साडी उज्जवला यांनी बेंगळुरूच्या अंगाडी गॅलरीतून खरेदी केली होती’, असा खुलासा सब्यासाची यांनी केला आहे.

दरम्यान, आज बेंगळुरु येथे दीपिका व रणवीरचे ग्रॅण्ड रिसेप्शन आहे. बेंगळुरुच्या लीला पॅलेस येथे हे रिसेप्शन होणार असून या रिसेप्शनमध्ये दीपिका व रणवीर दोघेही सब्यासाची यांनी डिझाईन केलेले कपडे परिधान करणार आहेत.