छोट्या पडद्यावर प्रसिध्दी मिळवल्यानंतर सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडमध्ये झपाट्याने यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. सध्या सुशांतकडे काही चांगले चित्रपट असून, यात दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘डिटेक्टिव्ह योमकेश बक्षी’चा समावेश आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत योमकेशची मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. असे असले तरी, डिझायनर सब्यसाचीची सहाय्यक दिव्या मेनन या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात करणार असल्याचे समजते. चित्रपटात ती योमकेशच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जींचा ‘डिटेक्टिव्ह योमकेश बक्षी’ हा चित्रपट पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या १३ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader