अभिनेता सचिन जोशी आणि उर्वशी या दाम्पत्याच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. सोमवारी (२० जानेवारी) उर्वशीने कन्यारत्नाला जन्म दिला. २०१२ मध्ये चित्रपटकर्ता आणि अभिनेता सचिनने उर्वशी शर्माशी विवाह केला होता. अलिकडेच ‘सेलिब्रेटी क्रिकेट लीग’मध्ये ‘तेलगू वॉरिअर्स’चे स्वमित्व स्वीकारलेला सचिन २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या सामन्यांसाठी हैदराबाद येथे क्रिकेटच्या सरावात व्यस्त होता. मुलीच्या जन्माची गोड वार्ता समजताच पत्नी आणि कुटुंबियांबरोबर आनंद साजरा करण्यासाठी सचिन तातडीने घरी परतला. याविषयी बोलताना सचिन म्हणाला, माझ्यासाठी या वर्षाची सुरूवात सीसीएल लीगच्या रुपाने खूप चांगल्या प्रकारे झाली असून, आता घरात माझ्या छोट्याशा सुंदर परीचे आगमन झाले आहे. लवकरच सचिन हैदराबादेत पुन्हा सराव करण्यास रुजू होईल.

Story img Loader