‘कोण होणार करोडपती’ हा मराठीत असलेला शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षक यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून या शोची प्रतिक्षा करत होते. आता लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे सुत्रसंचालन अभिनेता सचिन खेडेकर करणार आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. या कार्यक्रमात स्पर्धक हॉटसीटवर येतात. त्या प्रत्येकाला आपलंस करून त्यांच्याबरोबर हा ज्ञानाचा खेळ खेळावा लागतो. शोच्या प्रमोशन दरम्यान, सचिन खेडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि कोणत्या अभिनेत्याने साकारलेली महाराजांची भूमिका आवडली या विषयी सांगितले आहे.
सचिन खेडेकरणांनी नुकतीच ‘लोकसत्ता लाइव्ह’ला भेट दिली होती. यावेळी त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक चित्रपट बनत असून कोणत्या अभिनेत्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. “बापरे हा फार कठीण प्रश्न आहे. पण मी चिन्मयची भूमिका पाहिली, गश्मिरचं काम बघितलं मला असं भेदभाव करता येणार नाही कारण त्या सीनमध्ये किंवा त्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही तरी जादूई आहे की अभिनेत्याला देखील शक्ती मिळत असेल”, असे सचिन खेडेकर म्हणाले.
आणखी वाचा : “तुझं सर्वात Best Reel…”, जिनिलियाचा शक्ती कपूर यांच्यासोबत धमाल डान्स व्हिडीओवर रितेशची कमेंट चर्चेत
आणखी वाचा : KK ला श्रद्धांजली वाहण्यावरुन बादशाहला ट्रोलरने विचारलं, “तू कधी मरणार?”; बादशाह म्हणाला, “तुम्ही जे…”
महाराष्ट्राने अनेक नामवंत जगाला दिले आहेत. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विद्येचं माहेरघर आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या, मराठी मातीतल्या माणसांना हॉटसीटवर बसण्याची आणि करोडपती होण्याची संधी मिळणार आहे.