‘कोण होणार करोडपती’ हा मराठीत असलेला शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षक यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून या शोची प्रतिक्षा करत होते. आता लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे सुत्रसंचालन अभिनेता सचिन खेडेकर करणार आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. या कार्यक्रमात स्पर्धक हॉटसीटवर येतात. त्या प्रत्येकाला आपलंस करून त्यांच्याबरोबर हा ज्ञानाचा खेळ खेळावा लागतो. शोच्या प्रमोशन दरम्यान, बोल्ड दृश्यांसाठी प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडीतला ट्रोल केलं जातंय याविषयी सचिन खेडेकरांनी वक्तव्य केलं आहे.
सचिन खेडेकरणांनी नुकतील ‘लोकसत्ता डॉटकॉम’ला मुलाखत दिली. यावेळी रानबाजार या सीरिजमध्ये प्राजक्ता आणि तेजस्विनीने दिलेल्या बोल्ड सीनवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. “मराठी प्रेक्षकांना हिंदीमध्ये अशा भूमिका केलेल्या चालतात, पण मराठीत असं कोणी केलं की त्यांचा आक्षेप असतो. मला असं वाटतं की हे असं बरोबर नाही. त्या दोघींनी सीरिजमध्ये खूप छान काम केलं आहे. ज्या वयात आहेत त्यांना त्यानुसार भूमिका मिळाल्या आहेत, उलट त्यांना या भूमिका करताना एक अभिनेत्री म्हणून त्यांना वाव मिळाला आहे. त्यांनी ती भूमिका चांगल्याप्रकारे निभावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ट्रोल होत असल्याचे पाहून खूप वाईट वाटलं. त्या दोघी त्या कथेचा अविभाज्य भाग आहेत. अभिनेत्री म्हणून त्यांच्या कामाच कौतुक होण्या ऐवजी त्यांना ट्रोल करण्यात आलं हे खूप दुर्देवी आहे”, असे सचिन खेडेकर म्हणाले.
आणखी वाचा : “केकेची हत्या केली”, ओम पुरी यांची पूर्वाश्रमीची पत्नी नंदिता यांचा धक्कादायक आरोप
आणखी वाचा : सोनाक्षी सिन्हाला रामायणावरील या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आले नाही, बिग बी म्हणाले…
दरम्यान, सचिन खेडेकर आता कोण होणार करोडपतीचं सुत्रसंचालन करणार आहेत. महाराष्ट्राने अनेक नामवंत जगाला दिले आहेत. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विद्येचं माहेरघर आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या, मराठी मातीतल्या माणसांना हॉटसीटवर बसण्याची आणि करोडपती होण्याची संधी मिळणार आहे.