आपली युवा नायक प्रतिमा कायम राहावी यासाठी सचिन पिळगावकर जीतेन्द्रच्या मार्गाने चालला आहे. जीतेन्द्रने कायम आपल्यापुढील पिढीतील नायिकांचे नायक होण्यात यश मिळवले. ‘आसू बने अंगारे’मध्ये तो चक्क माधुरी दीक्षितचा नायक झाला. सचिनचेही तेच सुरू आहे. सावत:च्याच दिग्दर्शनातील ‘आयडियाची कल्पना’मध्ये त्याने आपली नायिका म्हणून भार्गवी चिरमुले हिची निवड केली. ‘एकापेक्षा एक’चा परिक्षक म्हणून त्याने तिला विजेती ठरवले होतेच. आता सतिश राजवाडे दिग्दर्शित ‘सांगतो ऐका’मध्ये संस्कृती बालगुडे त्याची नायिका आहे. मराठी चित्रपटासाठीचा हा अगदी नवा चेहरा होय. चित्रपटात हे दोघे पती-पत्नीच्या नात्यात असून, त्यांना सहा वर्षाचा मुलगा आहे. महत्वाचे आहे ते सचिनने या भूमिकेसाठी मागील पिढीच्या तारकेची निवड करणे टाळले. सचिनच्या एकूणच वाटचालीतील उत्साह अशा नवतारकांसोबत भूमिका करण्याच्या माध्यमातूनही जातो असे म्हणायचे.

Story img Loader